शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

ओसाड जागेवर साकारले निसर्गरम्य वनउद्यान!

By admin | Published: December 22, 2014 11:46 PM

रिसोड नगराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार; जलतरण तलावही होणार.

रिसोड : वनविभागाच्यावतीने व केंद्र शासनाच्या सहकार्याने रिसोडजवळ शासकीय ई-क्लासच्या एका ओसाड व निर्जन जागेवर मनमोहक, निसर्गरम्य असे वनउद्यान आकारास येत आहे. येथे आणखी स्विमिंग टँक व निसर्ग परिचय केंद्र होणार असल्यामुळे तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या शहराच्या सौंदर्यीकरणात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.रिसोड ते लोणी लोणार या राज्य महामार्गावर शहराच्या पश्‍चिमेस शासनाची ईक्लास जमीन आहे. ही जमीन ओसाड पडल्यागत होती. या जमिनीचा चांगल्या कामासाठी उपयोग घेता यावा म्हणून वनविभागाने संत अमरदास बाबा संस्थानपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या २ हेक्टर जमिनीत सदर उद्यान निर्मितीचा निर्णय घेतला व नियोजन करुन केंद्रशासनाच्या निधीतून उद्यान निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आकार घेत असलेले वनउद्यान हे शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठिकाणावर साकारत आहे. अमरदास बाबांच्या व लोणी येथील सखाराम महाराज संस्थानवर यात्रेनिमित्त विदर्भ, मराठवाडा तर खान्देशपासून श्रद्धेने भाविक येतात. त्यांना थोडाफार विरंगुळा म्हणून सदर उद्यान उपयोगात येणार आहे. जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराला भेट देण्यासाठी आंतरराट्रीय पर्यटक येतात व तेसुद्धा या वनउद्यानात भेट देवू शकतात.आतापर्यंंत २ हेक्टर परिसरात सभोवताल आकर्षक असे वनविभागाच्या उदबोधक रंगात तारकुंपण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उद्यानात वन्यजीव प्राणी म्हणजे हरीण, ससे, कोल्हे, खोकड आदी प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून जलाशय निर्मिती करण्यात आलेली आहे.रिसोड येथील वनउद्यान अंतिम टप्प्यात असून आगामी वर्षात स्विमिंग टँक करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे निसर्ग परिचय केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. चव्हाण यांनी स्पष्ट केले.