कोरोनामुळे शिष्यवृत्तीची परीक्षादेखील लांबणीवर पडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे या परीक्षेकडे लक्ष लागून होते. अखेर १२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ५८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परीक्षार्थींमध्ये विशिष्ट अंतर ठेवण्यात आले. या परीक्षेसाठी आठवीचे २३५३ आणि पाचवीचे ३९६४ अशा एकूण ६३१७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. प्रत्यक्षात पाच हजारांवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली तर एक हजार विद्यार्थी अनुपस्थित राहिले. या परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, उपशिक्षणाधिकारी आकाश अहाळे, गजानन डाबेराव, सहाही गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी केशव वैद्य, गणेश भाकरे, ठाकरे, चवरे यांनी परिश्रम घेतले.
००००
एसएमसी केंद्राला भेट
स्थानिक एसएमसी परीक्षा केंद्राला शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, उपशिक्षणाधिकारी आकाश अहाळे, गजानन डाबेराव, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे आदींनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी केंद्रसंचालक अभिजित मुकुंदराव जोशी, केंद्रप्रमुख प्राचार्य मीना उबगडे, सनियंत्रक नामदेव सरदार, पर्यवेक्षिका प्रणिता हरसुले आदींची उपस्थिती होती.