लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - विविध क्षेत्रातील कामगारांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. कामगार कल्याण केंद्र वाशिम अंतर्गत येणा-या कामगारांनी या शिष्यवृत्तीसाठी पाल्यांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन केंद्र संचालक देवानंद दाभाडे यांनी केले.जिल्ह्यातील लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता वाशिम नगर परिषद जवळील कामगार कल्याण केंद्रात शिष्यवृत्ती व विविध योजनांचे अर्ज उपलब्ध आहेत. या शिष्यवृत्तीचा लाभ कामगार कुटूंबियांना मिळावा त्याकरिता चार प्रकारात शिष्यवृत्ती योजना विभागण्यात आली आहे. सर्वसाधारण शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता नवीन उत्तीर्णपासून ते पुढील प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. सर्वसाधारण शिष्यवृत्ती नववी उत्तीर्ण ते पदवी, पदव्युत्तर, तांत्रिक पदविका, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. तसेच कामगार कुटूंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेकिरता गुणानुक्रम अथवा टक्केवारीची अट नाही. परदेशी शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या कामगारांच्या पाल्यांना ५० हजारापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. तसेच एमपीएससी, युपीएससी या स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षेचा टप्पा उत्तीर्ण करणाºया कामगार कुटुंबातील पाल्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. क्रीडा शिष्यवृत्ती योजनांतर्गत कामगार कुटूंबियांनी क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. या सर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा मुंबई कामगार कल्याण निधी कायदा अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणारे कामगार कुटूंबातील असणे आवश्यक आहे. या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी तसेच अधिक माहितीकरिता संबंधित पालक किंवा विद्यार्थ्यांनी कामगार कल्याण केंद्र, वाशिम येथे संपर्क साधावा, असे आवाहन केंद्र संचालक देवानंद दाभाडे, कर्मचारी बी.बी.पांगशे, जी.टी.आरु यांनी केले आहे.
कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 7:42 PM
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - विविध क्षेत्रातील कामगारांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. कामगार कल्याण केंद्र वाशिम अंतर्गत येणा-या कामगारांनी या शिष्यवृत्तीसाठी पाल्यांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन केंद्र संचालक देवानंद दाभाडे यांनी केले.जिल्ह्यातील लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता यावा याकरिता वाशिम नगर परिषद जवळील कामगार कल्याण केंद्रात ...
ठळक मुद्देमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची शिष्यवृत्ती योजना