मालेगाव: जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि विज्ञान अध्यापक मंडळ, मालेगाव यांच्या सयुक्त विद्यमाने येथील बाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला. त्यात अनेक शाळांनी सहभाग नोंदवून आपापल्या प्रतिकृती सादर केल्या. त्यापैकी इलेक्ट्रिक बोअरवेलची प्रतिकृती बनविणाºया करंजी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी वैष्णवी माधव खाडे हिचा प्रथम क्रमांक आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ संस्थेच्या सचिव रंजना देशमुख होत्या. शिक्षण विस्तार अधिकारी गौतम खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक गटातून वैष्णवी खाडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. याशिवाय बालशिवाजी शाळा मालेगावच्या ओम विजयराव देशमुख याने ‘एयर कुलर’ची प्रतिकृति बनवली होती, त्यास व्दितीय क्रमांक; तर सोलार कारची प्रतिकृती बनविणाºया निषाद सतीश घुगे व अनुज दिगांबर घुगे यांना तृतीय क्रमांक बहाल करण्यात आला. माध्यमिक गटातून प्रथम पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल, शिरपूरचा रेहान कौसर, साहिल परसुवाले, द्वितीय श्री नागनाथ माध्यमिक विद्यालय, मेडशीच्या प्रमोद आत्माराम राठोड व प्रतीक्षा सुभाष राठोड यांनी मिळविला; तर तृतीय क्रमांक ना. ना. मुंदडा विद्यालयाच्या सई चंद्रशेखर अनसिंगकर आणि गायत्री गोपाल शर्मा यांना विभागून देण्यात आला.
मालेगावात छोट्या वैज्ञानिकांचा अपुर्व विज्ञान मेळावा; स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:02 PM
मालेगाव: जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि विज्ञान अध्यापक मंडळ, मालेगाव यांच्या सयुक्त विद्यमाने येथील बाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला.
ठळक मुद्देबाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला.अनेक शाळांनी सहभाग नोंदवून आपापल्या प्रतिकृती सादर केल्या. प्राथमिक गटातून वैष्णवी खाडे, माध्यमिक गटातून शिरपूरचा रेहान कौसर प्रथम.