शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

छाननीत सरपंच पदाचे १७; सदस्य पदाचे ८७ अर्ज बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 1:58 AM

वाशिम: ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हय़ातील २७३  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ सप्टेंबरपर्यंत दाखल  उमेदवारी अर्जांपैकी एकूण १0४ अर्ज सोमवारच्या छाननीत बाद  ठरले. यामध्ये सरपंच पदाचे १७ तर सदस्य पदासाठीच्या ८७  अर्जांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हय़ातील २७३  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ सप्टेंबरपर्यंत दाखल  उमेदवारी अर्जांपैकी एकूण १0४ अर्ज सोमवारच्या छाननीत बाद  ठरले. यामध्ये सरपंच पदाचे १७ तर सदस्य पदासाठीच्या ८७  अर्जांचा समावेश आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत  असल्याने जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक ७  ऑक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचाय ती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्या तील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्या तील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपर्यंत दाखल  उमेदवारी अर्जाची सोमवार, २५ सप्टेंबर रोजी तहसील स्तरावर  छाननी करण्यात आली. वाशिम तालुक्यातून १५ ते २२ सप्टेंबर  या दरम्यान सरपंच पदासाठी एकूण २९८ तर सदस्य पदासाठी  ९७१ अर्ज दाखल झाले होते. सोमवारच्या छाननीत सरपंच  पदाचे चार अर्ज तर सदस्य पदाचे १५ अर्ज बाद झाले. आता सर पंच पदासाठी २९४ व सदस्य पदासाठीचे ९५६ अर्ज पात्र ठरले  आहेत.कारंजा तालुक्यातून सरपंच पदाच्या ५३ जागेसाठी २३९ अर्ज  दाखल झाले होते. यापैकी छाननीत एक अर्ज बाद झाला असून,  आता २३८ अर्ज पात्र ठरले आहेत. सदस्य पदाच्या ३९७  जागेसाठी ७५0 अर्ज दाखल होते. यापैकी ९ अर्ज बाद झाल्याने  आता ७४१ अर्ज पात्र आहेत.मानोरा तालुक्यातून सरपंच पदाच्या ४१ जागेसाठी १८६ अर्ज  दाखल झाले होते. यापैकी छाननीत एक अर्ज बाद झाला असून,  आता १८५ अर्ज पात्र ठरले आहेत. सदस्य पदाच्या ३४२  जागेसाठी ६७२ अर्ज दाखल होते. यापैकी १३ अर्ज बाद ठरले.  रिसोड तालुक्यातून सरपंच पदासाठी एकूण २१६ तर सदस्य  पदासाठी ८७३ अर्ज असे एकूण १,0८९ अर्ज दाखल झाले होते.  छानणीत सदस्य पदाचे एकूण २0 अर्ज बाद झाले तर सरपंच  पदाचा एकही अर्ज बाद ठरला नाही. आता १,0६९ अर्ज पात्र  ठरले आहेत. मंगरूळपीर तालुक्यात सरपंच पदासाठी २0४ अर्ज  दाखल होते. यापैकी दोन अर्ज बाद झाल्याने आता २0२ अर्ज  पात्र आहेत. सदस्य पदासाठी ६४४ अर्ज दाखल होते. यापैकी ८  अर्ज बाद झाल्याने आता ६३६ अर्ज पात्र आहेत. मालेगाव तालु क्यातून सदस्य पदासाठी ८५४ अर्ज दाखल होते. यापैकी २२  बाद ठरले तसेच सरपंच पदासाठी २५५ अर्ज होते. यापैकी ९  बाद ठरले. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज  मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.