कोरोनाकाळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ६ मार्चपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील, अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात परिस्थितीनुरूप योग्य कारण असेल व तसे करण्याशिवाय पर्याय नसेल, तर अशा परिस्थितीत उपविभागीय पोलीस अधिका-यांशी विचारविनिमय करून आदेश लागू करण्यास उपविभागीय दंडाधिकारी यांनी मान्यता आ आहे. आवश्यकता वाटल्यास उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी संवेदनशील ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी, दंडाधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात, असे जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
संवेदनशील ठिकाणी ‘एसडीओं’नी विशेष कार्यकारी अधिका-यांच्या नेमणुका कराव्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:55 AM