लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दुसऱ्या टप्प्यातील क्षयरुग्ण शोध मोहिम १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर यांनी दिली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ३५ हजार ४९ घरांना भेटी दिल्या जाणार आहेत. क्षयरुग्णांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी विविध टप्प्यात क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिम पूर्ण झाल्यानंतर १२ नोव्हेंबरपासून दुसºया टप्प्यातील शोध मोहिमेला प्रारंभ होत आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३५ हजार ४९ घरांना भेटी दिल्या जाणार आहेत. क्षयरुग्णांना योग्य व वेळेवर उपचार मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहिम राबविली जात आहे. संशयित क्षयरुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सदर शोध मोहिम यशस्वी करण्यासाठी ३०९ पथके तयार करण्यात आली आहेत. क्षयरोगाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सुधाकर जिरोणकर यांनी केले.
दुसऱ्या टप्प्यातील क्षयरुग्ण शोध मोहिम १२ नोव्हेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 5:38 PM