लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग : येथील नागसेन शिक्षण प्रसारक संस्था वारला व वाशिम जिल्हा कराटे असोसिएशन यांच्यावतीने अनसिंग प.दी. जैन विद्यालय येथे दुसरी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळपास २00 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत बीड, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, वाशिम या जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकाची कमाई वाशिम जिल्ह्याने केली आहे, तसेच द्वितीय क्रमांक यवतमाळ पुसद येथील संघाने केली आहे व तृतीय क्रमांक बीड जिल्ह्याने घेतला आहे. या स्पर्धेला शतीकांत कराटे इंटरनॅशनल रेफरी व महाराष्ट्र कराटे असोसिएशनचे योगेश चव्हाण, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे योगेश चव्हाण, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागसेन शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव प्रल्हाद इंगोले, हे होते तरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाले, पोलीस ठाणेदार अनसिंग धनंजय वानखेडे, डॉ.ईश्वरचंद्र हुरकट, डॉ.दिलीप भुसारी, बालकिसन नवगणकर, बाळूभाऊ माल, चिंतामण डांगे, कुमार, सावळकर, या कार्यक्रमाला पंच म्हणून संतोष कांबळे, नितीन मेंढे, डोंगरे, किरण खंडारे, टिचर, शिवकांबळे, अमन कांबळे, मनोज अंबीरे, मांडवगडे, इसावी, अजय पडघान, महेंद्र सावंत यांनी काम पाहिले. या सर्व स्पर्धेचे आयोजक वाशिम जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव चंद्रसेन इंगोले यांनी केले होते.
अनसिंग येथे दुसरी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात
By admin | Published: June 09, 2017 1:17 AM