कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाशिम जिल्ह्यात ३४ हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. या लाटेत फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत ४२४ लोकांचा बळी गेला. शिवाय शासनाने पुन्हा लॉकडाऊन केल्याने व्यवसायांवर गदा आली. अनेकांना आजारावर लाखो रुपये खर्च करावा लागला, अनेकांना या आजाराची लागण होण्याची भीती वाटू लागली. याच कारणामुळे नागरिकांत डिप्रेशनचे प्रमाण वाढले आणि ते घालविण्यासाठी औषधी घेण्यावर अनेकांनी भर दिला. त्यामुळे कोरोनानंतर डिप्रेशन घालविणाऱ्या औषधींची विक्री मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे. काही मंडळींनी मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याविना आणि तपासणीविनाच या औषधी दुकानातून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
---------------
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) डिप्रेशन का वाढले?
कोरोना संसर्गामुळे गतवर्षी पाच ते सहा महिने लॉकडाऊन लागल्याने लोकांना सतत घरात राहावे लागले. त्यातून सावरत असतानाच यंदा मार्चपासून पुन्हा लॉकडाऊन लागल्याने अनेकांच्या मनावर विपरीत परिणाम झाला.
२) लॉकडाऊनमुळे सतत घरात राहावे लागले. एकसारख्या वातावरणात कोंडून राहिल्यासारखे वाटू लागले. वातावरणात बदल होत नसल्याने अनेकांच्या मनावर या स्थितीचा परिणाम होऊन डिप्रेशनमध्ये वाढ झाली.
३) जम बसत असलेला व्यवसाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झाला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे अनेकांना डिप्रेशन आले.
--------------
२) हे टाळण्यासाठी काय कराल?
१) कोणतीही स्थिती सतत कायम राहत नाही. कोरोनाची दहशतही संपणारच असून, व्यवसाय, धंदे पुन्हा सुरळीत होणार असल्याने या स्थितीचा फार विचार करून अस्वस्थ होऊ नये. नेहमी सकारात्मक विचार करावा, लोकांशी आनंदी चर्चा करून वेळ घालविण्याचा सतत प्रयत्न करावा.
२) डिप्रेशन येत असेल, तर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सकस आणि चांगला आहार घ्यावा. फास्ट फूड घेणे टाळावे, तंबाखू, सिगारेट ओढू नये, मद्य प्राशन करणेही टाळून आपले आरोग्य अधिकाधिक कसे चांगले राहील याचा प्रयत्न करावा.
३) डिप्रेशन आल्यानंतर ते घालविण्यासाठी औषधीचा आधार घेणे मुळीच योग्य नाही. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यक आहे, त्याचप्रमाणे शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवणेही आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम करणेही गरजेचे आहे.
----------------
४) औषधी विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ
कोट : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांच्या मनात धडकी भरली. अनेक जण डिप्रेशनमध्ये गेले. त्यामुळे गत चार महिन्यांत कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या औषधीनंतर डिप्रेशन घालविण्यासाठी लागणाऱ्या औषधींची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. मानसोपचार तज्ज्ञांकडून अनेकांनी उपचार घेतले.
-राजू पाटील शिरसाट,
एक औषध विक्रेता
------------------
कोट : कोरोना संसर्गामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. आजारामुळे खर्च वाढला. सततच्या घरात राहण्यामुळे नैराश्य आले. एकाच वातावरणात अनेक दिवस राहिल्याने डिप्रेशनच्या प्रकारांत वाढ झाली. हे डिप्रेशन घालविण्यासाठी अनेकांनी उपचारही घेतले. वाशिम जिल्ह्यातही दुसऱ्या लाटेमुळे असे प्रकार घडले आहेत.
-डॉ. नरेश इंगळे,
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम
--------------------
कोट : कोरोना संसर्गाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही दिवसांतच दुसरी लाट उसळली. यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले. लॉकडाऊनचे विपरीत परिणाम दिसून आले. अनेकांच्या मनात आजाराची भीतीही वाढली. कामाच्या पद्धतीत बदल झाले. मोकळेपणाने वावरणे अशक्य झाले. त्यामुळे अनेकांना डिप्रेशन आले. यावर उपचार आणि मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही अनेकांनी घेतला.
-डॉ. प्रजा इंगळे,
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम