०००००
कोरोना चाचणी करण्याचे आवाहन
रिसोड : कोरोनाचा आलेख खाली आला असून धोका अजून संपलेला नाही. सर्दी, ताप व खोकला, घसा आदी लक्षणे असणाऱ्या तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संदिग्ध रुग्णांनी वेळ न दडविता तातडीने कोरोना चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने सोमवारी केले.
०००००
३० तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालय नाही
वाशिम : गावपातळीवरील महसूल विभागाचा कणा असलेल्या तालुक्यातील जवळपास ३० तलाठ्यांना कार्यालयासाठी स्वतंत्र जागा व इमारत नाही. भाड्याच्या खोलीतून कामकाज करावे लागत आहे.
००००००००
प्लास्टिक पिशवी दिसल्यास कारवाई
रिसोड : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास मनाई आहे. शहरातील विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये तसेच ग्राहकांनादेखील प्लास्टिक पिशव्यांमध्ये अन्य वस्तू देऊ नये, अशा सूचना नगर परिषद प्रशासनाने सोमवारी केल्या.
००००००००
कायमस्वरुपी बीडीओ केव्हा मिळणार?
वाशिम : वाशिम पंचायत समितीचे गत एका वर्षापासून कायमस्वरुपी गटविकास अधिकाऱ्यांचे (बीडीओ) पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार सध्या प्रमोद बदरखे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वाशिम पंचायत समितीला कायमस्वरुपी गटविकास अधिकारी केव्हा मिळणार? याकडे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांचे लक्ष लागून आहे.
००००००००००००००००