वाशिम : नागरतास (ता.मालेगाव) येथून मालेगावकडे दुचाकीने येणाºया दोघांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार, १३ डिसेंबर रोजी तलवारीसह घातक शस्त्र जप्त केले.नागरतास येथून दोन इसम हे दुचाकीने घातक शस्त्र घेऊन मालेगाव शहरात येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यावरून मालेगाव शेलु फाटा ते नागरतास रस्ता या दरम्यान सापळा रचण्यात आला. एम.एच. ३७ आर ०५७५ व विना क्रमांकाची दुचाकी अशी दोन दुचाकीवरील इसम संशयित दिसून आल्याने पोलीस पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. आकाश सुरेश शिंदे (२०) रा. अल्लाडा प्लॉट वाशिम व देवा उर्फ देवीदास दत्ता सारसकर (२५) रा. काकडदाती ता.जि. वाशिम या दोन युवकांची पंचासमक्ष झडती घेतली असता, दोघांकडून दोन तलवार, चार खंजीर व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपीविरूद्ध मालेगाव पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण व चमू आणि मालेगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी पार पाडली.
मालेगाव शहरातून तलवारीसह घातक शस्त्र जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:38 PM