जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० यादरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव ३०, कारंजा २८, मंगरूळपीर २५, वाशिम २४ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सरपंच पदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी वाशिम तालुक्यातील १२, रिसोड तालुक्यातील १७, मालेगाव तालुक्यातील १०, कारंजा तालुक्यातील १४, मंगरूळपीर तालुक्यातील १३ व मानोरा तालुक्यातील नऊ अशा एकूण ७५ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत बहुमत असणाऱ्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी अधिकाधिक ग्रामपंचायतींवर आमच्याच पक्षाचा, गटाचा झेंडा फडकल्याचा दावा केल्याने राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील ७५ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांची निवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:42 AM