लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) -राज्यस्तरीय शिवशाही कबड्डी स्पर्धेसाठी स्थानिक श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची निवड झाली आहे. राज्यस्तरीय शिवशाही कबड्डी स्पर्धा ईस्लामपूर जि. सांगली येथे २० ते २३ डिसेंबर या दरम्यान होणार असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १० विभाग पाडण्यात आले आहे. त्यापैकी अमरावती विभागाच्या मुलींच्या संघात कारंजा येथील शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयातील चार विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेतील खेळात राज्यातील सुमारे पाच हजार विद्यार्थी व विद्याथीर्नींचा सहभाग राहणार आहे. अमरावती महिला कबड्डी संघात महाविद्यालयातील विद्याथीर्नींची निवड होणे ही विशेष उल्लेखनीय बाब मानली जात आहे. निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये पूजा नीतनवरे, स्वाती बरडे, सुजाता खडसे, कांचन तायडे यांचा समावेश असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ डिसेंबर रोजी रवाना झाल्या आहेत. स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी या खेळाडूंचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. कैलाश गायकवाड, डॉ. अशोक जाधव, उमेश कुºहाडे, डॉ. योगेश पोहोकार, प्रा. पराग गावंडे, प्रा. संजय कापशीकर, प्रा. नितेश थोरात, प्रा. दिलीप वानखेडे, उमेश देशमुख, प्रवीण डफडे, बाळकृष्ण खानबरड, राजू राऊत, अरूण ईसळ, प्रकाश लोखंडे व सुनील राजगुरे आदींची उपस्थिती होती.
राज्यस्तरीय शिवशाही कबड्डी स्पर्धसाठी धाबेकर महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 4:42 PM