लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सायकलिंग असोशिएशन आॅफ महाराष्टÑ यांचे मान्यतेने सालेकसा जि. गोंदीया येथे ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरिय रोड सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता वाशिम जिल्हयाचा संघ निवडण्याचे दृष्टीने वाशिम जिल्हा सायकलिंग असोशिएशनच्यावतिने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन ६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून राज्यस्तरिय रोड सायकलिंग स्पर्धेकरिता सहभागी होणाऱ्या वाशिम जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता वयोगट ठरविण्यात आले असून यामध्ये पुरुष व महिला १९ ते ३५ वर्षाआतील, सिनिअर मुले मुली १९ वर्षाआतील, ज्युनिअर मुले-मुली १८ वर्षाआतील, सबज्युनिअर मुले-मुली १४ वर्षाआतील तसेच बनावटीच्या सायकलीच्या स्पर्धेसाठी पुरुष १९ ते ३५ वर्षाआतीलचा समावेश राहिल. सदर जिल्हास्तरिय स्पर्धा प्रत्येक वयोगटासाठी विविध अंतरासाठी असणार आहे. प्रत्येक गटातून प्रथम, व्दितीय क्रमांकाच्या खेळाडुची राज्यस्तरिय रोड सायकलिंग स्पर्धेकरीता निवड होणार आहे. तरी इच्छूक सायकलपटू व सायकल क्लबनी वयाचा दाखला, दोन रंगीत फोटो तसेच दहावी , बारावीत शिकत असलेल्या सायकलपटुंनी गुण सवलतसाठी आपल्या शाळेचे बोनाफाई प्रमाणपत्र घेवून उपस्थित रहावे. स्पर्धेकरिता स्वत:ची सायकल व हेलमेट असणे आवश्यक आहे. तरी इच्छूक सायकलपटुंनी निवड चाचणी स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन सायकलिंग असोशिएशन आॅफ महाराष्टÑचे उपाध्यक्ष धनंजय वानखेडे व वाशिम जिल्हा सायकलिंग असोशिएशनचे सचिव अनिल देशमुख यांनी केले आहे.
राज्यस्तरिय सायकलींग स्पर्धेकरिता निवड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 2:16 PM