लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: एस.टी.मध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांकडून वापरल्या जाणाऱ्या बनावट कार्डाला आळा घालून बोगसगिरीला पायबंद घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. हे कार्ड तयार करून देण्याची प्रक्रिया सद्या सुरू असून वाशिम आगारात नियोजनाचा पुरता अभाव असल्याने आॅनलाईन प्रक्रियेत वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, स्मार्ट कार्ड काढायला येणाºया ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास ताटकळत बसावे लागत असल्याचे दिसून येत आहे.शासनाने विविध सामाजिक घटकांना महामंडळाच्या एसटीमधूून प्रवासाची सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी सवलतीचे साधे कार्ड मिळत असल्याने बनावट कार्ड बनवून अनेकजण एसटीच्या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यावरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्मार्ट कार्ड योजना जाहीर केली; मात्र हे कार्ड मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया किचकट ठरत असल्याने ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे दिसत आहे.
स्मार्ट कार्डासाठी ज्येष्ठ नागरिकांना बसावे लागतेय ताटकळत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 3:04 PM