शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

बालकांसाठी १२५ खाटांची स्वतंत्र सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:27 AM

वाशिम : राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना ...

वाशिम : राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचारासाठी १०० खाटांची स्वतंत्र सुविधा, तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथेही लहान मुलांसाठी २५ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला.

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी सर्व सोयी-सुविधायुक्त स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली. बालकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची जबाबदारीदेखील निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये १०० खाटांची, तर कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे २५ खाटांची स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली आहे. लहान मुलांच्या कक्षामध्ये खेळणी, सायकल, दूरचित्रवाणी संच यासारखी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली असून, भिंतीवर विविध कार्टून लावण्यात आली आहेत. यामुळे लहान मुलांच्या मनातील भीती दूर होऊन ते खेळीमेळीत राहण्यास मदत होइल.

०००००

...अशा आहेत खाटा

नवजात शिशूंसाठी १०

लहान मुलांसाठी १०

१२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ३०

१२ ते १८ वर्षे वयोगटातील मुले ५०

००००

आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण -डॉ. मधुकर राठोड

कोरोनाबाधित लहान मुलांसाठी तयार असलेल्या विविध कक्षांमधील सर्व खाटांना सेंट्रल पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, तसेच नवजात शिशू अतिदक्षता विभागात ६ इनक्युबेटर, लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात १० व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ६ बालरोगतज्ज्ञ व १२ स्टाफ नर्सेससह आरोग्य कर्मचाऱ्यांचा चमू याठिकाणी नियुक्त केला जाणार असून, सर्वांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.