लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: वेगळय़ा विदर्भाच्या मागणीसाठी वाशिम जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्याव तीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी व्यक्त केला. त्यानंतर रिपाईच्यावतीने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्या त आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे, की रिपाई ए च्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून वेगळय़ा विदर्भाची मागणी करण्यात येत असून, यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे विदर्भवादी जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी विदर्भ वेगळा होणे गरजेचे आहे. विदर्भात कोळसा, वनसंपत्ती, कापूस आदि मुबलक असतानाही विदर्भा त बेरोजगारी वाढत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी वेगळा विदर्भ हाच पर्याय आहे. त्यामुळे शासनाने आमच्या मागणीची दखल घ्यावी, असे या निवेदनात नमूद आहे. या आंदोलनात रिपाई एचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मोहनसिंग राठोड, अरविंद उचित, सुखदेव खोडके, संजय भिसे, ज्ञानेश्व अढागळे, उल्हास इंगोले, प्रकाश गवई, रामचंद्र सुर्वे, प्रकाश आंबेकर, रविंद्र भगत, विलास गवई, भीमराव गवई, महादेव राऊत, हिरामन साबळे, डॉ . रमेश वानखडे, गोविंदराव इंगोले, सोपान बनसोड, मोतीराम पट्टेबहाद्दूर, लिलाबाई गव्हांदे, गजानन राऊत, अजय इंगोले, प्रशांत वानखेडे, विद्यानंद वानखेडे, शंकर बोर्डे, आकाश ढोले, जय वानखेडे, जनमंचचे जुगलकिशोर कोठारी, शिवसंग्रामचे संतोष सुर्वे, महादेव जाधव, उत्तमराव आरू, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पवन राऊत यांच्यासह शेकडोंची उपस्थिती होती.
वेगळय़ा विदर्भासाठी रिपाइंचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:22 AM
वेगळय़ा विदर्भाच्या मागणीसाठी वाशिम जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्याव तीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी व्यक्त केला. त्यानंतर रिपाईच्यावतीने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आले.
ठळक मुद्देशेकडोंची उपस्थितीजिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन