ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सोयींयुक्त आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नवीन इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून, पुरुष तथा महिला मंडळीसाठी निवासाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी गटविकास अधिकारी कालिदास तापी यांनी तातडीने विलगीकरण कक्ष सुरू केल्याने ग्रामपंचायत प्रशासनाची प्रशंसा करत फारशी लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णाला या विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी विस्तार अधिकारी साही चव्हाण, पोलीस पाटील उमेश देशमुख, उपसरपंच रघुनाथ भगत, प्रभारी ग्रामसेविका विजया पाटील, मंडळ अधिकारी एस.व्ही. खाडे, पटवारी एस.जी. मुंडाले, वहीदभाई, बबन हळदे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी फिरोजखान, गजानन वानखडे आदींची उपस्थिती होती.