वाशिम : गेल्या आठवड्याभरापासून शिक्षणाधिकारी व बनावट कागदपत्रांच्या आधारावर नियुक्तीवर असलेल्या शिक्षण विभागातील कर्मचार्यांवर फसवणुकीच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. १२ डिसेंबर रोजी वाशिम येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये शिक्षणाधिकारी व पाच शिक्षकांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा शिक्षण उपसंचालक पवार यांनी दाखल केला. कारंजा तालुक्यातील विविध शाळांवर माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे यांच्यासह गणेश नामदेवराव मते, वंदना महावीर तडकल, नेतपाल सुधाकर राठोड, मुज्जमील मेहमूद खान व चंद्रकांत शरदराव येवले यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. उपरोक्त शिक्षक हे विविध शाळांवर नेमणूक नसताना ज्या शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्यांचा उल्लेख न करता व ज्या शाळेमध्ये शिक्षक पदावर समायोजन करण्यात आले आहे तेथे नियमाप्रमाणे नियुक्तीचे आदेश निर्गमित न करता बनावट कागदपत्रे तयार करून स्वत:चे फायद्याकरिता २0 ऑगस्ट २0१४ ते २0 ऑक्टोबर २0१४ या कालावधीमध्ये माध्यमिक शाळा समायोजनाचे सहाय्यक शिक्षक या पदाचे आदेश काढून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंविचे कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४१९, ४२0, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शिक्षणाधिका-यांवरील गुन्ह्यांची मालिका सुरूच
By admin | Published: January 13, 2015 1:01 AM