लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: २०१७ मध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या मुंग, उडीद, सोयाबीन तुर आदी पिकांला अनियमित पाउस व खोड अळी मुळे फळ धारणा झाली नाही. परीणामी शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पिकांचा सर्व्हे करून व्याजासह नुकसान भरपाई दयावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कारंजाच्यावतीने विलास राउत, विजय गागरे, चांदभाई मुन्नीवाले यांनी तहसिलदार कारंजा यांच्या मार्फेत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना ७ सष्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. दिलेल्या निवेदनात नमुद केले की, राष्टवादी कॉंगेस पक्षाच्या वतीने कृषी सहााययक मुसळेव खंडारे यांच्या सोबत जाउन खतनापुर, इमामपुर, धनज, बग्गी परीसरातील पिकांची पाहणी केली. तेव्हा पिकाला फळधारणा झाली नाही. यावेळी राष्ट्रवादी कॉेंग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष विलास राउत, शहर अध्यक्ष विजय गागरे, जिल्हा सचिव चांदभाई मुन्नीवाले ज्ञानेश्वर करडे, घनश्याम पाटील, गजानन गाडवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फळधारणा न झालेल्या पिकांचा सर्व्हे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 8:23 PM
२०१७ मध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या मुंग, उडीद, सोयाबीन तुर आदी पिकांला अनियमित पाउस व खोड अळी मुळे फळ धारणा झाली नाही. परीणामी शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पिकांचा सर्व्हे करून व्याजासह नुकसान भरपाई दयावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कारंजाच्यावतीने विलास राउत, विजय गागरे, चांदभाई मुन्नीवाले यांनी तहसिलदार कारंजा यांच्या मार्फेत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना ७ सष्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देशेतकरी सापडला पुन्हा अडचणीत पिकांचा सर्व्हे करून व्याजासह नुकसान भरपाई दयावी - मागणी