लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण असून, नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सोयाबीनच्या सुड्यांच्या रखवालीसाठी जागरण करीत आहेत. जिल्ह्यात गत काही वर्षांत या पिकाचा पेरा एकूण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांहून अधिक होत आहे. यंदाही जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झालेली होती. त्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र तब्बल २ लाख ८७ हजारांहून अधिक होते. आता हे पीक काढणीवर आले आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने पूर्णपणे सुकलेल्या सोयाबीनच्या शेंगा फुटून दाणे खाली पडत असल्याने शेतकरी कापणीची घाई करीत आहेत. एकाचवेळी अनेक शेतकºयांकडून मजुरांची मागणी होत असल्याने शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कापून ठेवलेले सोयाबीन काढण्याचीही घाई असल्याने मळणीयंत्रांची मागणी वाढल्याने ते मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकरी सोयाबीनच्या सुड्या लावून ठेवत आहेत. त्यातच सुड्या जळण्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे. गत तीन दिवसांत रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या दोन घटनांत ५० क्ंिवटलहून अधिक सोयाबीन खाक झाले आहे. राबराब राबतानाच मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर हाताशी आलेल्या पिकाची राखरांगोळी होऊन आर्थिक संकट कोसळू नये, या भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी सोयाबीनच्या सुड्यांची रखवाली करीत आहेत.
वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याचे सत्र, शेतकऱ्यांचे जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:46 PM
वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत.
ठळक मुद्देरिसोड तालुक्यात सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या दोन घटनांत ५० क्ंिवटलहून अधिक सोयाबीन खाक झाले आहे.पिकाची राखरांगोळी होऊन आर्थिक संकट कोसळू नये, या भितीपोटी शेतकरी रात्रीच्या वेळी सोयाबीनच्या सुड्यांची रखवाली करीत आहेत.