लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून, १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारीही नियुक्त केले. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी तसेच संपर्क क्रमांकावर द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शुक्रवारी केले.जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ध्वनी प्रदूषण टाळण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागातर्फे ‘अॅक्शन प्लॅन’ आखला असून, तक्रार नोंदविण्यासाठी ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच वाशिम पोलीस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरही तक्रार नोंदविता येणार आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका मीना, वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरिष गवळी, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाढवे, रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, मालेगावचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव, शिरपूरचे पोलीस निरीक्षक एच. एस. नाईकनवरे, मंगरूळपीरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पराजे, मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक आर. बी. जायभाये, अनसिंगचे पोलीस निरीक्षक बबन कºहाळे, आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. शेख, जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू जाधव, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक एम. एम. बोडखे, कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे, मानोराचे पोलीस निरीक्षक डी. आर. बावनकर, धनजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर मानकर या पोलीस अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे असून गृह शाखेचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक अनिल ठाकरे हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रा. म. वानखेडे हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावरही संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.
ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी सनियंत्रण समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 6:15 PM