सन १९५९-६० पासून आजपावेतो १८३० आक्षेप प्रलंबित असताना १००५ आक्षेपांचा निपटारा केला आहे. उर्वरित लेखा आक्षेप निकाली काढण्याचे काम करीत आहेत. यामध्ये प्राधान्याने कर वसुली विभागाचे कर अधीक्षक अ. अजीज अ. सत्तार व प्राथमिक , माध्यामिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ लिपिक चंद्रकांत देशमाने यांनी त्यांचे विभागाचे आक्षेपांचा १०० टक्के निपटारा केला. त्यास्तव ५ जानेवारी राेजी मुख्याधिकारी यांचे हस्ते त्यांच्या कक्षात नगराध्यक्ष अशाेक हेडा, उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह ठाकुर, मुख्याधिकारी दीपक माेरे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर प्रलंबित परिच्छेदांचा विहित नियमानुसार निपटारा करण्यासाठी नगर परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. याबाबत जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच इतर नगर परिषदांनी सुध्दा याप्रकारे प्रलंबित परिच्छेद निपटारा करण्यासाठी कार्यवाही करावी याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निर्देश देण्याचे सूचित केले.
...................
जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिल्यानंतर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी प्रथम प्राधान्य देत प्रलंबित लेखा परीक्षणाकडे विशेष लक्ष देत त्याचा निपटारा करण्यात आला. जिल्ह्यातील पहिली नगर परिषद निपटारा करण्यामध्ये वाशिम नगर परिषद ठरली आहे. हे सर्व श्रेय कर्मचाऱ्यांना जाते.
- दीपक माेरे, मुख्याधिकारी, वाशिम
.............
वाशिम जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना प्रलंबित लेखा परीक्षण आक्षेपांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या हाेत्या. वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन जवळपास सर्वच आक्षेपांचा निपटारा केला. जिल्ह्यातील इतरही नगर परिषदांनी ताबडताेब निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-श्णमुगराजन एस, जिल्हाधिकारी