वाशिम : महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून गणल्या गेलेल्या ह्यई-चावडी, ई-फेरफारह्णअंतर्गत शेतीचा हस्तलिखित सात-बारा उताराचे संगणकीकरण करण्यात येवून त्यावर संबंधित तालुक्यातील तहसीलदारांची डिजिटल स्वाक्षरीची सोय करण्यात आली आहे. हे सात-बारा ह्यआपले सरकार पोर्टलह्णवर ह्यअपलोडह्ण करण्यात आले असून ते मिळविणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोपे झाले आहे. ह्यआपले सरकार पोर्टलह्णवर शेतकऱ्यांना डिजिटल सात-बारा मिळत असून या दस्तावेजाच्या प्रतीवर तलाठ्यांची सही, शिक्याची गरज राहिलेली नाही. हा सात-बारा कुठेही वापरता येत आहे. वाशिम जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे ९५ टक्के सात-बारा प्रमाणित करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
‘आपले सरकार पोर्टल’मुळे सात-बारा मिळणे झाले सोपे!
By admin | Published: May 07, 2017 7:23 PM