लोकमत न्युज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात खते व बियाण्यांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. त्या शिवाय सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, २० गुण नियंत्रण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या हंगामात लॉकडाऊनमुळे शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाकडून ग्रामीन जिवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत बचतगटांतर्फे शेतकºयांच्या बांधावर खते, बियाणे पोहोचविण्यात येत आहेत. त्यानंतरही शेतकºयांना बियाण्यांसह विविध खतांची गरज भासणार असल्याने खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर जावे लागणार आहे. यात शेतकºयांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, परवाना नसलेल्या कृषी निविष्ठांची विक्री कृषीसेवा केंद्रांकडून होऊ नये म्हणून कृषी विभागाने व्यापक उपाय योजना केल्या आहेत. त्यात जिल्हाभरात सात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला असून, २० गुण नियंत्रण निरीक्षकही नियुक्त केले आहेत. हे गुण नियंत्रण निरीक्षक सर्व कृषीसेवा केंद्रांना भेटी देऊन त्यांच्याकडे परवाना असलेल्या कृषी निविष्ठांची तपासणी करीत आहेत.
तपासणीसाठी नमुन्यांचे संकलन पूर्णयंदाच्या खरीप हंगामाठी कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी निर्धारित लक्षांकानुसार एप्रिल, मे व जून अखेर नमुन्यांचे संकलन १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून, हे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. कृषी निविष्ठांच्या या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कार्र्यवाही कृषी विभागाच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी दिली आहे.
शेतकºयांची फसवणूक टाळण्यासाठी सहा तक्रार निवारण कक्ष, २० गुण नियंत्रण निरीक्षक, सात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. शेतकºयांनीही अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे, खते खरेदी करावी आणि खरेदीची पावती स्वाक्षरीनिशी घ्यावी. खरेदी केलेल्या निविष्ठांच्या वेष्टनावरील माहिती तपासून घ्यावी आणि काही तक्रारी असल्यास तालुकास्तरावर तक्रार निवारण समितीकडे तक्रार करावी. खरेदी पावती, ७/१२ व ८ -अ उताºयासह ही तक्रार करता येईल. -एस. एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम