मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी पुरस्कारांची घोषणा केली. सन २०१९-२० या वर्षाचा जिल्हास्तरीय आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड या ग्रामपंचायतीस प्राप्त झाला. शिवणी रोड ग्रामपंचायतीने तालुका आणि जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार मिळविल्यामुळे सरपंच लल्लू गारवे आणि ग्रामसेवक एस. पी. गावंडे यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्याच बरोबर वाशिम तालुक्यातील टणका, मालेगाव तालुक्यातील बोरगाव, रिसोड तालुक्यातील मोहजा इजारा, मानोरा तालुक्यातील विठोली आणि कारंजा तालुक्यातील दिघी या ग्रामपंचायतीने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याने ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
पूर्वीच्या स्मार्ट ग्राम पुरस्काराचे नाव आता आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार असे करण्यात आले असून पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय प्रथम ४० लाख आणि तालुकास्तरीय प्रथम १० लाख एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, निवड समितीचे सदस्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास बंडगर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता औतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन राम श्रृंगारे यांनी केले तर आभार समितीचे सदस्य सचिव विकास बंडगर यांनी मानले.