लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : शेतकरी वरुणराजाची ऐनवेळेवर हुलकावणी , सततच्या नापीकीला सामोरे जात असताना आपल्या जिद्द व चिकाटीने कारखेडा येथील शेतकरी योगेंद्र रंगराव देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत एकरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन घेण्याची किमया केली.मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील प्रगतीशिल शेतकरी योंगेंद्र रंगराव देशमुख यांनी उन्हाळ्यातच मे मध्ये तुरीची पेरणी केली, पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने ठिंबकव्दारे तुरीला पाणी दिले. त्यानंतर पेरणीच्या वेळेस अंतरपिक म्हणून सोयाबीनची पेरणी केली,परंतु पावसाने दगा दिल्याने सोयाबीनचे फारसे उत्पन्न झाले नसते तरी तुर पिकावर अधिक लक्ष घालत तुरीची योग्य निगा राखली. कारखेडा येथे इतरत्र एकरी एक पोते उत्पन्न होत असतांना त्यांनी एकरी सात पोते उत्पन्न घेतले. उन्हाळ्यातच तुरीची पेरणी केल्याने वातावरणात झालेल्या बदलामुळे झालेल्या धुक्याच्या फारसा परिणाम त्यांच्या तुरीवर झाला नाही. त्यांच्या बहरलेल्या तुरीला पाहणीसाठी अनेक शेतकºयांनी भेटी दिल्या व त्यांनी केलेल्या नियोजनाबाबतची माहिती जाणून घेतली.
दुष्काळी परिस्थितीत घेतले एकरी सात क्विंटल तुरीचे पिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 3:59 PM