वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु, संचारबंदीच्या १५ दिवसातही रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. ३१ मार्च ते १४ एप्रिल यादरम्यान नव्याने ४,१४६ रुग्णांची भर पडली तर, १५ एप्रिल ते १ मे यादरम्यान तब्बल ७,२८३ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.
राज्यासह देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने सुरुवातीला निर्बंध कठोर केले. त्यानंतर संचारबंदी लागू केली. १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. मात्र, संचारबंदीच्या काळातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ३१ मार्च ते १४ एप्रिल यादरम्यान नव्याने ४,१४६ रुग्णांची भर पडली तर, १५ एप्रिल ते १ मे यादरम्यान तब्बल ७,२८३ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. मात्र, हा वेग कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात दैनंदिन सरासरी २,७०० कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. संचारबंदी नियमाचे पालन केले जात आहे. मात्र, सकाळी १० वाजतादरम्यान बाजारपेठांमध्ये गर्दी कायम राहत असल्याचे दिसून येते. संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होईल, असा अंदाज असतानाच, रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येते.
०००००
३१ मार्च ते १४ एप्रिल
एकूण रुग्ण ४,१४६
बरे झाले ३,८५३
पॉझिटिव्ह रेट १२
कोरोनामुक्तीचा दर १०
००००००००
१५ एप्रिल ते ३० एप्रिल
एकूण रुग्ण ७,२८३
बरे झाले ६,२३१
पॉझिटिव्ह रेट १३
कोरोनामुक्तीचा दर ११