वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, पर्यटन क्षेत्र म्हणून शिरपूर गाव परिचित आहे. मात्र, या गावाला आजरोजी खराब रस्ते, सांडपाणी समस्यांनी ग्रासले आहे. या गावातील जगविख्यात जैन मंदिराकडे जाणारा रस्तावरील सांडपाणी निचरा करणाऱ्या नाल्या नियमित तुडुंब भरलेल्या असतात. परिणामत: काही ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येते. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याने रस्त्याचेही नुकसान झाले आहे. असाच प्रकार वार्ड नंबर सहा, पोलीस स्टेशन ते जानगीर महाराज संस्थान रस्त्यावरही बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळते. इतर रस्त्यांचीही योग्य प्रकारे सांडपाणी निचरा करण्यासाठी व्यवस्था नसल्याने अशीच अवस्था आहे. जवळपास पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या व मोठा विस्तार असलेल्या शिरपूर पर्यटन क्षेत्र गावातील सांडपाणी समस्या दूर करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. यासाठी ग्रामविकास मंत्रालयातून अधिक निधी उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे किंवा तीर्थक्षेत्र विकास निधीतून यासाठी विशेष निधी उपलब्ध करून भूमिगत गटार योजना राबविल्याशिवाय गावातील सांडपाण्याची समस्या दूर होऊ करणार नाही.
००००००
कोट
‘पर्यटन क्षेत्राचा ब दर्जा असलेल्या शिरपूर गावातील सांडपाण्याची समस्या गंभीर झाली आहे. ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी भूमिगत गटार योजना निर्माण करणे गरजेचे आहे.’
मोहसीन खा
ग्रामस्थ वार्ड क्रमांक ६ शिरपूर जैन.
०००
बॉक्स....
जगविख्यात अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर, जानगीर महाराज संस्थान, हजरत मिर्झा बाबा दर्गा, विश्वकर्मा मूळ देवस्थान, जगदंबा देवी मंदिर यासह गावामध्ये बरीच धार्मिक स्थळे आहेत. मात्र, या स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर नियमित सांडपाणी वाहताना दिसते. हे चित्र बदलावयाचे असेल, तर सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे.