शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

शहीद स्तंभ स्मारकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:10 AM

वाशिम : ब्रिटिशांविरोधात ९ ऑगस्ट १९४२ मध्ये भारतीय क्रांतिकारकांनी पुकारलेल्या भारत छोडो आंदोलनाला बुधवार, ९ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला वाशिम जिल्ह्यातील शहीद स्तंभ, शहीद स्मारक, हुतात्मा स्मारक व जयस्तंभ आदींची पाहणी केली असता, काही स्तंभांची दुरवस्था झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देप्रशासनाने लक्ष देण्याची गरज सौंदर्यीकरणासाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ब्रिटिशांविरोधात ९ ऑगस्ट १९४२ मध्ये भारतीय क्रांतिकारकांनी पुकारलेल्या भारत छोडो आंदोलनाला बुधवार, ९ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला वाशिम जिल्ह्यातील शहीद स्तंभ, शहीद स्मारक, हुतात्मा स्मारक व जयस्तंभ आदींची पाहणी केली असता, काही स्तंभांची दुरवस्था झाल्याचे दिसून आले.स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या भारतमातेच्या सुपुत्रांच्या स्मरणार्थ स्तंभ, स्मारक वाशिम शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी उभारल्या गेले आहेत. केवळ स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन, क्रांती दिन अथवा इतर राष्ट्रीय सणांच्या दिवशी देशभक्तींचा आव आणणारी जनता व प्रशासनाला प्रत्यक्षात मात्र स्वातंत्र्य व स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या भारतमातेच्या सुपुत्रांच्या स्मारकांकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेले शहीद स्तंभ, शहीद स्मारक, हुतात्मा स्मारक व जयस्तंभ आदींनी ही बाब अधोरेखित केली आहे. अनेक स्मारकांची आजमितीला दुरवस्था झालेली आहे. काही स्मारकांना गवताच्या साम्राज्याने वेढले, तर काहींची पडझड झाली. काही स्मारकांना घाणीने आपल्या कवेत घेतले तर काही स्मारकांचा रंग उडाला आहे. काही ठिकाणी स्मारकांची देखभाल केली जाते, ही आशादायक बाबीही निदर्शनात आली. वाशिम नगर परिषदेच्या प्रांगणात सुमारे ४२ वर्षापूर्वी देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या व कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले स्मारक आता बर्‍यापैकी दुरूस्त केल्याचे दिसून येते. . वाशिम नगर परिषद प्रांगणात स्वातंत्र सेनानी स्मारक उभारण्यात आले. या स्मारकावर भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेले हुतात्मे तसेच स्वातंत्र्य लढय़ात कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरलेली आहेत. स्वत:च्या जिवांची पर्वा न करता वाशिमच्या देशभक्तांनी स्वातंत्र्य लढय़ात खुप मोठे योगदान दिले आहे. वाशिम येथील या देशभक्तांच्या आठवणींचा हा ठेवा जतन करण्यासाठी सर्वांगीन प्रयत्नांची गरज आहे. या स्तंभावर स्वातंत्र्य लढय़ातील अबुज दत्तात्रय कृष्णराव, काशिराम o्रीधर लक्ष्मण, सुभगाबाई o्रीधर काशिकर, तुकाराम रावजी परळकर, माधवराव कोलवा निंबेकर, धिसड नारायण बाळकृष्ण, दवंडीवाले सिताराम रघुजी, पन्नालाल रामनारायण, मदनलाल किसनलाल बाकलीवाल, रामचंद्र o्रीराम दाभाडे, माधव रामचंद्र भागवत, शंकर गोपाल डबीर, विठ्ठल कृष्णराव पाठक, कृष्णराव माधवराव पाठक, कृष्णराव गंगाधर हटकर, सुदाम सखाराव, गंगाधर अवंत तायडे, महादेव गणेशा दातार, इंदुमती साने व यादवराव लक्ष्मणराव खपली केकतउमरा इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरलेली आहे.  

रिसोड : पंचायत समितीच्या प्रांगणात स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांचे व कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ १९८३ मध्ये स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभ व स्मारकाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढय़ाच्या आठवणीदेखील पुसट होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या स्तंभावर अशोकचक्र कोरले आहे. सुरुवातीस या स्तंभाभोवती बगीचा होता व त्याची साफसफाई नियमित केली जात होती. ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आदी दिनी वीर जवानांना मानवंदना दिली जायची. सद्यस्थितीत या स्तंभाची दुरवस्था होवून चारही बाजुला घाण व गवत वाढलेले दिसून येते. या स्तंभावर वीर जवान अंबादास रामचंद्र शुक्ला, सखाराम मारोती हागे, उकंडाभाऊ गोपाळ गवळी, गणपत केशवराव देशमुख, शंकरलाल रामचंद्र भारुका, दत्तात्रय देशमुख, गणपत भुजंगराव देशमुख, तेजराव कृष्णराव देशमुख, यांची नावेही अस्पष्ट झाली आहेत. या खेरीज करडा येथील शहिद जवान विश्‍वनाथ खिल्लारे यांच्या स्मारकाची सुध्दा दुरवस्था झाल्याचे दिसून येते. खिल्लारे सैनिक दलात कार्यरत असतांना अतिरेकी कारवाईमध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. या स्तंभाच्या सौंदर्यीकरणासाठी सर्वांगीन प्रयत्न होणे गरजेचे ठरत आहे.

कारंजा येथील जयस्तंभाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा !कारंजा लाड : भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्राणाची आहूती देणार्‍या शहिदांचे स्मरण राहावे याकरिता कारंजा येथे जयस्तंभाची उभारणी करण्यात आली. मात्र आजरोजी या जयस्तंभाची दयनिय अवस्था झाली असून उभारलेल्या जयस्तंभाचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे आहे.भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरिता भारतीय जवानांनी प्राण अर्पण केले. या वीर जवानांची स्मृती चिरकाल राहावी, याकरिता जयस्तंभाची उभारणी करून त्या ठिकाणी हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्याबरोबरच श्रद्धांजली अर्पण केली जाते. कारंजा शहराच्या मध्यभागी जयस्तंभ उभारले गेले आहे. विरांना आजही येथे मानवंदना दिल्या जाते. आज जयस्तंभाची अवस्था बिकट झाली असून जयस्तंभाला जाहिरातीचे फलक लावले असल्याचे दिसून येते. येथे चित्रपटांचे जाहिरात फलक असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. या जयस्तंभाचे सौंदर्यीकरण करण्याच्याहेतूने आजुबाजूने पाण्याचे कारंजे उभारले गेले होते. सध्या कारंजे बंद आहेत. शहिद भगतसिंगाचे स्मारक सौंदर्यीकरणाचा प्रश्न यावर्षी निकाली निघाला. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाचे सौंदर्यीकरणदेखील करण्यात आले. आता केवळ जयस्तंभाचे सौंदर्यीकरण करण्याची प्रतीक्षा आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.