या चर्चासत्रात मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, मंगरूळपीरचे ठाणेदार धनंजय जगदाळे, सतीश जामोदकर (लेखक, अभ्यासक सत्यशोधक चळवळ), प्रा. डॉ. वासुदेव भगत (फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अभ्यासक), प्रा. प्रमोद तायडे (अधिव्याख्याता), दीपक भालेराव, पोलीसमित्र व स्वच्छता अभियान वाशिम जिल्हा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर संगीता आव्हाळे तर शमा परवीन, डॉ. अशपाक (महिला तक्रार निवारण आसेगाव) यांनी सहभाग घेऊन राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विनोद डेरे वाशिम जिल्हाप्रमुख महाराष्ट्र पोलीसमित्र नागरिक संरक्षण समिती यांनी केले, तर नारायण आव्हाळे, संजय तेलंग, डॉ. प्रा. संजय इंगळे, प्रा. कावरे, गोपाल माचलकर यांनी निमंत्रितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पौर्णिमा इंगळे व सानिका इंगळे यांनी गीत गायन करून मंत्रमुग्ध केले. पोवाडा सादरीकरण रमेश भोंडणे व साथ संगत प्रमोद निचळे, जाधव, संजीव भगत, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद मंगरूळपीर यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. कोरोना नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.
मंगरूळपीर येथे शाहू महाराज जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:27 AM