वाशिम : पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत सिंचन विहिरीचा लाभार्थी निवड करताना पाच अपात्र लाभार्थ्यांना पात्र ठरविल्या प्रकरणी मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील तलाठी एन. एम. केकन व ग्रामसेवक एस. बी. बोदडे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २५ मे रोजी देण्यात आली.शेतीला सिंचनाची जोड मिळावी यासाठी सिंचन विहिरीवर भर दिला जात आहे. जिल्ह्यात सहा हजार सिंचन विहिरींना मंजूरात मिळालेली असून, निवड प्रक्रियादेखील राबविण्यात आली. दरम्यान, काही ठिकाणी अपात्र लाभार्थींना पात्र ठरविले असल्याच्या तक्रारी होत्या. शिरसाळा येथील तलाठी केकन व ग्रामसेवक बोदडे यांनी लाभार्थी निवड करताना दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार न पाडणे, शासकीय निर्णयांचे पालन न करता अपात्र लाभार्थ्यांना पात्र ठरवून शासनाची दिशाभूल केल्याचे सिद्ध झाले. यामुळे या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
शिरसाळाचे तलाठी, ग्रामसेवक निलंबित
By admin | Published: May 25, 2017 7:59 PM