लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गत अनेक दिवसांपासून ‘सिरींज’ आणि ‘आय.व्ही.सेट’चा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, पाच हजार रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार असल्याने वैद्यकीय अधिकाºयांनी त्यातून सिरींज व आय.व्ही.साठी होणारा खर्च भागवावा, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ असून गोरगरिब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.शिरपूर येथे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारत उभारण्यात आली. काही दिवसांपूर्वी या इमारतीत रुग्णसेवा देखील सुरू झाली. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत तथा तुलनेने मोठी बाजारपेठ असलेल्या शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन किमान १५० ते २०० रुग्ण उपचाराकरिता नियमित येत असतात; परंतु रुग्णांना उपचारादरम्यान देण्यात येणाºया सलाईन व इंजेक्शनकरिता आवश्यक असणारी सिरींज व आय.व्ही. सेटचा आठ महिन्यापासून तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरिब रुग्णांना जवळचा पैसा खर्चून खासगी औषधी दुकानातून सिरींज व आय.व्ही. सेट विकत घ्यावी लागत आहे. तशी चिठ्ठी एका साध्या कागदावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित कर्मचाºयांकडून लिहून दिली जात आहे. हा प्रकार योग्य नसून जिल्हास्तरावरून सिरींज व आय.व्ही. सेट उपलब्ध होत नसतील तर पाच हजार रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार असल्याने वैद्यकीय अधिकाºयांनी त्यातून तात्पुरता खर्च भागवावा, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी दिले; मात्र त्यानंतरही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.
वरिष्ठ स्तरावरूनही सिरींज व आय.व्ही. सेट मिळत नसल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. पाच हजार रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार असले तरी रुग्णांची संख्या कितीतरी पटीने अधिक असल्याने त्यातून खर्च भागविणे अशक्य आहे. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली आहे.- श्रीकांत करवतेवैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरपूर