वाशिम : केंद्रशासीत भाजप सरकारने शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष करून एकतर्फी व विनासूचना चुकीची कारवाई करण्याच्या धोरणांबाबत शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून या प्रकाराचा शिवसेनेने जाहीर निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी ३० ऑगस्टला निवेदन दिले.
मागील काही महिन्यांपासून केंद्रशासित भाजप सरकारने शिवसेनेला लक्ष (टार्गेट) करत असून भाजपच्या आमदाराविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध आवाज उठविल्यास ईडी किंवा इतर चौकशा शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध लावून शिवसेनेला महाराष्ट्रात त्रास देण्याचे भाजपचे षङ्यंत्र सुरू आहे तसेच शिवसैनिकांनी आमदार राजेंद पाटणी यांच्याविरुद्ध पुराव्यासहित दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन पाटणी परिवार व पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्सची ईडीमार्फत चौकशी होणे गरजेचे असताना ते होत नाही. या मागील उद्देश म्हणजे फक्त शिवसेनेला डिवचणे हेच आहे. खा. भावनाताई गवळी यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विषय असो, निकृष्ट दर्जाचे महामार्गाचे काम असो, शहरातील गुंठेवारीचा विषय असो किंवा इतर लोकहिताच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे विषय प्रखरतेने समोर आणून न्यायनिवाडा करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु या सर्व बाबींचा केंद्रशासित भाजप सरकार किंवा महाराष्ट्रामधील भाजपच्या नेत्यांना राग व द्वेष असल्याने त्यांनी स्वत:च्या आमदाराचे घोटाळे असतानाही त्यांच्यावर कोणतेही कारवाई न करता कोणतेही चुकीचे काम नसताना एका महिला खासदाराला लक्ष केले आहे. ही एकतर्फी व विना सूचना कारवाई निंदनीय असून त्याबाबत त्याचा आम्ही निषेध करतो तसेच शिवसैनिकांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्याविरुद्ध पुराव्यांसहित दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन पाटणी परिवार व पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्सची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसैनिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
कारवाईचा निषेध नाेंदविण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ मापारी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख रवीभाऊ भांदुर्गे, उपजिल्हाप्रमुख महादेव सावके, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, मालेगाव तालुका प्रमुख उद्धव गोळे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, युवा सेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, माजी सभापती विजय खानझोडे, उपशहरप्रमुख नामदेव हजारे, उपशहरप्रमुख गणेश पवार, उपशहरप्रमुख मोहन देशमुख, युवा उपशहर प्रमुख आकाश कांबळे, खादीग्राम उद्योग संचालक बालाजी वानखेडे, शिवसैनिक राजाभैय्या पवार, न. प. सदस्य कैलास गोरे, राजू भांदुर्गे, अतुल वाटाणे, उमेश मोहळे, गणेश गाभणे, चंदूभाऊ खेलुरकर, केशव दुबे, संतोष गवळी, पवन इतरकर, लोखंडे, चंदू जाधव, बंडू शिंदे, बबलू अहिर, रामकृष्ण वानखेडे, राजू धोंगडे, अशोक शिराळ, श्रावण गवळी, ज्ञानेश्वर गोरे, चेतन इंगोले, सतीश खंडारे, तसलीम पठाण, समीर कुरेशी, विलास जाधव, सुरडकर, बळी, रत्नाकर गंगावणे, शिवम घुगे, गौरव इंगळे, दीपक इढोळे, गणेश इंगोले, युवा सेना प्रसिद्धीप्रमुख नारायण ठेंगडे तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी व समस्त शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.