लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकांनी दर्शनी भागात लावण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाभरात बँकांसमोर ‘डफडे बजाओे’ आंदोलन केले. राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर, निकषात बसलेले किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, याबाबतची माहिती अद्याप निश्चित व परिपूर्ण झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही आपले कर्ज माफ झाले की नाही, याची माहिती नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती व्हावी, यासाठी संबंधित बँकांनी लाभार्थी यादी मागवून ही यादी सूचना फलकावर लावावी आणि त्या संबंधित बँकेकडून किती शेतकरी कर्जमुक्त झाले, हे जाहीर करावे, या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभरात बँकांसमोर डफडे बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिवसेनेचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन
By admin | Published: July 11, 2017 2:01 AM