लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेनेने ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका चौकात ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी’ करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विदर्भाचे शिवसेना संपर्क नेते तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्हाप्रमुख राजेश पाटील व माजी जि.प. सदस्य डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले.केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने दोन वर्षांपूर्वीच बोंडअळीसमोर बीटी बियाणे टिकत नसल्याचे कृषी विभागाला कळविले होते. या कापूस संशोधन संस्थेच्या अहवालाची दखल घेतली असती तर शेतकर्यांना आज या विपरित परिस्थितीला तोंड देण्याची गरज पडली नसती. मात्र कृषी विभागाने बीटी बियाणे कंपनीच्या लाभासाठी शेतकर्यांना खाईत लोटले, असा आरोप करीत शिवसेनेच्या शेकडो पदाधिकार्यांनी स्थानिक अकोला नाका चौकात बोंडअळी सोबतच कृषी विभागाची होळी करून निषेध नोंदविला. त्यानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना बोंडअळीग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसानभरपाई द्यावी या मागणीचे निवेदन दिले. आठ दिवसाच्या आत शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा निवेदनातून दिला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेश पाटील, माजी जि.प. सदस्य डॉ. सुभाष राठोड, उपजिल्हा प्रमुख माणिक देशमुख, दिनेश राठोड, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, नगरसेवक कैलास गोरे , नितीन मडके, अतुल वाटाणे, मधु इतकर, संतोष इंगळे, राजाभय्या पवार, सुरेश इंगळे, सतिष खंडारे, रवी पाटील, दिलीप कास्टे, रामा इंगळे, विठ्ठल चौधरी,पवन इंगोले, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संगिता पिंजरकर, ज्योती खोडे, सुनिता गव्हाणकर, भाग्यश्री राठोड, तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, रामदास मते, संतोष सुरळकर, नरहरी कडू, रवि पवार यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.
वाशिम येथे शिवसेनेचे आंदोलन : ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 2:06 AM
वाशिम : कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेनेने ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका चौकात ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी’ करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
ठळक मुद्देनुकसानभर पाईसाठी कार्यकर्त्यांनी काढला मोर्चा