संस्थेचे सचिव चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण व दीप प्रज्वलित करून प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर यांनी केले. यानिमित्ताने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रमोद देवके यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ. एस.एस. पवार (इतिहास विभागप्रमुख) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करताना कोणकोणत्या अडचणी आल्या, कोणाकोणाशी संघर्ष करावा लागला यावर सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर यांनी शिवरायांच्या स्वराज्य क्रांतीचे व त्यांच्या कर्तृत्वाचे समर्पक वर्णन करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून कोणता तरी एक गुण अंगीकृत करावा, असे आव्हान आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रमोद देवके (रासेयो कार्यक्रम अधिकारी) यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शिवस्वराज्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:51 AM