शिरपूर जैन - कार्तिकी पोर्णिमेनिमित्त अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानच्यावतिने पार्श्वनाथ प्रभुंची गावातून शोभायात्रा ४ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिगंबर जैन संस्थानच्यावतीने यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ८.३० वाजता अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. ९ वाजता पंडित विजयकुमार व पंडित दिलीप महाजन यांचय प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. १० वाजता श्रींचा अभिषेक व पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य मार्गावरुन शोभायात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक पार्श्वनाथ प्रभू की जय चा जयघोष करीत मुख्य रस्त्याने पोलीस स्टेशन , जुन्या आठवडी बाजारातून पवळी मंदिरामध्ये नेण्यात आली. यावेळी मंदिरात मिरवणूक विसर्जीत करण्यात आली. पवळी मंदिर परिसरात पदयामी, दानायामा विधानाचार्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शिरपूर सह मालेगाव, हराळ, रिसोड, वाशिम, कारंजा, ब्राम्हणवाडा, तामसी, मेहकर येथून दिगंबर जैन बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. या कार्यक्रमासाठी दिगंबर जैन तिर्थ सुरक्षा मंडळ, दिगंबर जैन युवक मंडळाने परिश्रम घेतले.
VIDEO - जैनांच्या काशित पार्श्वनाथ प्रभूंची शोभायात्रा, शिरपूर नगरी दुमदुमली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2017 3:17 PM