लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजाबांधव व अनुयायांच्यावतीने १ ऑगस्ट रोजी वाशिम शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत मोठय़ा संख्येत समाजबांधवांची उपस्थिती होती.स्थानिक शुक्रवारपेठ परिसरातील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथुन या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. सुशोभीत रथात अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा विराजमान करुन डि.जे. व बॅन्जो या वाद्यवृंदासह शोभायात्रेला प्रारंभ झाला. शुक्रवारपेठ, मन्नासिंह चौक, नगर परिषद, सुभाष चौक, बालु चौक, शिवाजी चौक येथे पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करुन शोभायात्रा मार्गस्थ झाली. पाटणी चौक मार्गे डॉ. आंबेडकर चौक येथे शोभायात्रा आली असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सदर शोभायात्रेचा विठ्ठलवाडी येथे समारोप करण्यात आला. शोभायात्रेमध्ये समाजाच्या विविध मंडळांनी सहभाग घेतला. मोठय़ा संख्येत युवकांचा सहभाग असलेली ही शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेदरम्यान पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शोभायात्रेने दुमदुमली वाशिम नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:21 AM
वाशिम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजाबांधव व अनुयायांच्यावतीने १ ऑगस्ट रोजी वाशिम शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत मोठय़ा संख्येत समाजबांधवांची उपस्थिती होती.
ठळक मुद्देअण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात समाजबांधवांसह अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग