लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबिनला ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असताना लोणी येथे मात्र २५०० ते २६०० रुपयेच दर दिला जात आहे. याशिवाय अनेक व्यापारी अनधिकृत पद्धतीने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करित आहेत. याविरोधात लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. आंदोलक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लोणी येथे गत अनेक वर्षांपासून उपबाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ठोस सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव हजारो टन शेतमालाची अल्पदराने विक्री करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेवून बंद असलेली उपबाजार समिती तत्काळ सुरू करावी व हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करण्याचा प्रकार आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात ज्ञानेश्वर बोडखे, गोविंद सानप, विजय बोडखे, रवि बोडखे, चंदू चौगुले यांच्यासह इतर शेतकºयांनी सहभाग नोंदविला.
अनधिकृत धान्य खरेदीविरूद्ध शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 1:59 PM
व्यापारी अनधिकृत पद्धतीने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करित आहेत. याविरोधात लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले.
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. संबंधित व्यापाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.