हाेळी सणानिमित्त विविध रंग, गाठीसह दुकाने थाटली हाेती. यामुळे गर्दी हाेत असल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक माेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दी टाळण्यासाठी पथकाला पाठवून रस्त्यावरील बरीच दुकाने हटविण्यात आली. तसेच काेराेना संसर्ग पाहता सर्वांनी काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले. हाेळी असल्याने बाजारपेठेत खरेदीदारांचीही गर्दी माेठ्या प्रमाणात दिसून आली. २९ मार्च राेजी रंगपंचमी असल्याने शहरात थाटलेल्या रंगाच्या दुकानावर खरेदीदारांची गर्दी हाेती.
.................
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
काेराेना संसर्ग पाहता नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबासाेबतच शहरवासियांची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काेठेही गर्दी हाेणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
....................
शहरवासिय, व्यापाऱ्यांनी गर्दी हाेणार नाही, याप्रकारे नियाेजन करून काेराेना संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी. काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कारवाईची माेहीम नगरपरिषदेने हाती घेतली आहे. व्यापाऱ्यांनी काेराेना चाचणी करुन घेणे बंधनकारक असून ज्यांनी चाचणी केली नाही, त्यांची दुकाने सील करण्यात येतील. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी.
- दीपक माेरे, मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम