लोणी बु. येथे एप्रिल महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यूदेखिल झाला आहे. यामुळे गावात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांत रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने १४ मे रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करून नागरिकांनी स्वत:हून आरटीपीसीआर, अँटिजन चाचणी करून घेण्याचे आवाहन केले; मात्र त्यास अल्प प्रतिसाद मिळाला. शिबिरप्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी सागर बिजोरे, आरोग्य सेवक नितीन अस्टोनकर, लॅब टेक्निशियन रोशनी दांडेकर, तलाठी राजेंद्र जाधव, ग्रामसेवक प्रल्हाद घुगे, पोलीस पाटील अंबादास दीक्षे, सरपंच प्रवीण बोडखे, सरपंच अरविंद गाडे, ग्रामपंचायत सदस्य निलेश बोडखे, रामेश्वर टकले, विनोद बोडखे, हनुमान बोडखे, सोहम बोडखे, समाधान बोडखे आदी उपस्थित होते.
लोणी येथे कोरोना चाचणी शिबिरास अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:39 AM