कोंडोली येथे आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी शिबिराचे नियोजन करण्यात आल्यानंतर ग्रामस्तर कोरोना समितीने संपूर्ण गावात दवंडी देऊन कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन गावकºयांना केले; परंतु गावकरी कोरोना शिबिराकडे फिरकलेही नाहीत. जि.प. शाळेत ग्रामस्तरिय समितीमधील सदस्य मोठया संख्येने गैरहजर होते. त्यामुळे मानोरा तहसीलदार यांनी दिलेले २०० लोकांच्या कोरोना चाचणी उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. यावेळी पोलीस पाटील सुरेश पवार,उप सरपंच गजानन राऊत, ग्राम पंचायत सदस्य सुधाकर ठोंबरे, सुदाम तायडे, ग्राम सेवक राजेश शिंदे, केंद्र प्रमुख श्रीकृष्ण कुटे, मुख्याध्यापक योगीराज शिंदे, तलाठी वैशाली वानखडे, परिचारिका तेंलग,पेटकर गुरुजी, सुषमा जाधव, आशा स्वयंसेविका अनामिका खडसे, दिलीप नागापुरे, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण जाधव, आदिंनी सहकार्य केले एन एस चव्हाण प्रयोग शाळा तज्ञ यांनी चाचणी घेतली
कोंडोली येथे कोरोना चाचणीला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:43 AM