लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील लघूसिंचनचे चार उपविभाग व सहा सिंचन शाखांतर्गत एकंदरित १९२ पदांना मंजूरी आहे. प्रत्यक्षात मात्र ९३ पदेच भरलेली असून तब्बल ९९ पदे रिक्त असल्याने कामे प्रभावित होत आहेत. याशिवाय कार्यरत कर्मचाºयांवर कामांचा अतिरिक्त ताण येत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने रिक्त असलेली पदे विनाविलंब भरावी, अशी मागणी होत आहे.प्राप्त माहितीनुसार, सहा सिंचन शाखांमध्ये उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, अनुरेखक, टंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, दत्पर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, वाहनचालक, कालवा टपाली, शिपाई, चौकीदार, कालवा चौकीदार, संदेशक आदिंची आकृतीबंधानुसार १९२ पदे आवश्यक आहेत. मात्र, त्यापैकी ९३ पदे भरलेली असून ९९ पदे रिक्त आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाजासह सिंचन प्रकल्प परिसरातील कामांवर विपरित परिणाम जाणवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.लघूसिंचन विभागांतर्गत अत्यंत आवश्यक असलेली ९९ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचाºयांवरच रिक्त पदांचा अतिरिक्त प्रभार सोपवावा लागत आहे. त्याचा काहीअंशी कामांवर परिणाम जाणवत असून रिक्त पदे भरण्यात आल्यास सोयीचे होणार आहे.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, लघूसिंचन विभाग, वाशिम
अपुऱ्या मनुष्यबळामुळे लघूसिंचन विभाग हैराण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:43 PM