युरिया खतांमध्ये नत्राचे प्रमाण जास्त असल्याने , या खताला सर्वच शेतकरी पसंत देत असतात.
यावर्षी पाऊस वेळेवर आल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली नाही. पहिल्याच पावसात पिके उगवल्याने यावर्षी पिकांची स्थिती उत्तम आहे. दोन-तीन दिवसांपासून पाऊस सतत पडत असल्यामुळे जमिनीतील नत्र कमी होते. त्यामुळे पिके पिवळी पडतात अशात शेतकरी पिकांना हिरवेगार ठेवण्यासाठी युरिया खत देत असतात. परंतु युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अनसिंग येथील अनेक कृषी सेवा केंद्रावर कीटकनाशक औषधींच्या नावावर शेतकरी वर्गाची होणारी लूट थांबवावी.
व तालुका कृषी अधिकारी यांनी येऊन अनेक कृषी सेवा केंद्रावर होणारी लूट व असलेया युरिया खताची चौकशी करावी, अशी मागणी येथील शेतकरी रामेश्वर आनंदा गोरे यांनी केली आहे.