वैचारिक बाबींना उत्तर विचारांनीच मिळायला हवे - मोहन शिरसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 8:05 PM
लोकमत न्यूज नेटवर्क व वाशिम :तब्बल तीन वर्षे कठीण परिश्रम घेवून सन २००४ मध्ये ‘ वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे ...
लोकमत न्यूज नेटवर्कववाशिम :तब्बल तीन वर्षे कठीण परिश्रम घेवून सन २००४ मध्ये ‘वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे पुस्तक प्रकाशित करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कवी तथा बालभारती, पुणे मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य मोहन शिरसाट यांनी रचलेल्या ‘नाही फिरलो माघारी’, या कविता संग्रहाला तब्बल ६ मानाचे पुरस्कार मिळण्यासोबतच मुंबई विद्यापिठाने त्यांच्या कवितेचा अभ्यासक्रमात देखील समावेश केला. याबाबत तद्वतच साहित्यीक आणि कवी यांच्यासंदर्भातील पुर्वीची आणि आताची स्थिती, याबाबत साधलेला हा संवाद...आपणास लिखानाची, कविता रचण्याची आवड कशी निर्माण झाली? माझे मूळ गाव कान्हेरी गवळी (ता.बाळापूर) असून शिक्षण एम.ए., बी.एड. झालेले आहे. १९८६ पासून मी वाशिममध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यालयीन जीवनात प्रथम विठ्ठल वाघ यांच्या तोंडून वºहाडी भाषेतील कविता ऐकली होती, तेव्हापासूनच वाचनाची, लिखानाची आवड निर्माण झाली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होवून प्रसिद्ध साहित्यिक, कवी यांची पुस्तके वाचत गेला आणि लिखानाची प्रेरणा मिळत गेली. कुठले पुस्तक, कवितासंग्रह प्रकाशित झाला?मी लिहिलेले ‘वाशिम जिल्ह्याचा इतिहास’ हे पुस्तक सन २००४ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर २०१८ मध्ये ‘नाही फिरलो माघारी’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यास आतापर्यंत ६ पुरस्कार मिळाले आहेत. साहित्यीक, कवी यांच्यासंदर्भात काय सांगाल? कवी आणि साहित्यिकांची समाज परिवर्तनात मोलाची भूमिका राहिलेली आहे. असे असताना त्यांच्या लिखानावर आक्षेप घेवून त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सद्या सुरू आहे. त्यातूनच काहींच्या हत्या देखील झाल्याने देशभरातील अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना सद्य:स्थितीत पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. साहित्यीकांच्या बाबतीत समाजाची भूमिका कशी असावी? साहित्यिक असो अथवा कवी दोन्हीही घटक आपल्या लिखानातून समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांच्या विचारांना संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना यात आपला जीव गमवावा लागल्याने या क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. वैचारिक बाबींना त्याच ताकदीने विचारांनीच उत्तर मिळावे. त्यासाठी आक्रमकपणा नसावा, असे आपले मत आहे. समाजाने संगित, साहित्य यासह विविध कलांचा विकास होण्यासाठी प्रयत्न केल्यास परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही.