शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

श्री नाथ नंगे महाराज संस्थानात जनसागर लोटला !

By admin | Published: February 04, 2017 1:41 AM

डव्हा येथे २00 क्विंटल महाप्रसादाचे वितरण; यात्रा महोत्सवाची सांगता, दर्शनासाठी भाविकांची रिघ.

मालेगाव, दि. 0३- श्रीक्षेत्र डव्हा येथील श्री नाथनंगे महाराज संस्थान येथील यात्रा महोत्सवांची सांगता ३ फेब्रुवारीला रथसप्तमीला भव्य महाप्रसादाने झाली. जवळपास एक लाख भाविकांनी श्री नाथ नंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला. २00 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.विदर्भाची ह्यपंढरीह्ण म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र डव्हा संस्थानवर रथसप्तमीला भव्य यात्रोत्सव असतो. नाथ नंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळते. या महोत्सवाला २८ जानेवारीपासून सुरूवात झाली होती. ३ फेब्रुवारीला भव्या महाप्रसादाने या यात्रोत्सवाचा समारोप झाला. महाप्रसादासाठी ७५ क्विंटल गहू, ५0 क्विंटल भाजी, बुंदीसाठी १५ क्विंटल बेसन, साखर ३0 क्विंटल, तेल ३0 क्विंटल असे साहित्य लागले. सकाळी सुर्योदयाच्या वेळी श्री नाथनंगे महराज व प.पू. विश्‍वनाथ बाबांच्या समाधी व मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती झाली. ह्यश्रींह्णच्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.दूपारी ४ वाजता महाप्रसादाची पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुक काढत महाप्रसाद वितरणस्थळी आणण्यात आला. शिस्तबद्धरित्या भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पंगत बसवून महाप्रसाद ट्रॅक्टरद्वारे वितरित करण्यात आला.महाप्रसाद वितरणाकरिता २५00 स्वयंसेवकांनी सेवा दिली. ५0 ट्रक्टरमधुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पाणी वाटपासाठी ६ टँकर होते. रथसप्तमीला प. पू. नाथनंगे महाराजांनी प.पू. विश्‍वनाथ बाबांच्या शरीरात परकाया प्रवेश श्री क्षेत्र माहूर येथे केला होता. त्याचे स्मरण म्हणून या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात या वर्षी एक लाख भाविक सहभागी झाले होते, असा दावा करण्यात आला. आमदार अमित झनक, जि.प. सभापती सुधीर गोळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य शाम बढे., रत्नप्रभाबाई घुगे, शामसुंदर मुंदडा, मुकुंदराव मेडशिकर, सुभाषराव घुगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यात्रा महोत्सवात रोगनिदान शिबिर,जनजागृती शिबिर यांचे आयोजन केले होते. बच्चे कंपनीसाठी विविध प्रकारचे खेळ, साहित्य, चित्रपटगृह यात्रेत थाटली आहेत.'लोकमत'च्या 'तुझे तुलाच' या विशेष पानाचा गौरवश्री नाथ नंगे महाराज श्रीक्षेत्र डव्हा यांच्या पुण्यतिथिनिमित्त ह्यलोकमतह्णने विशेष पानाच्या माध्यमातून नाथनंगे महाराज, विश्‍वनाथ बाबा, डव्हा संस्थान व एकंदर यात्रोत्सवाचा आढावा घेतला. या विशेष पानाचा गौरव यात्रेच्या मुख्य दिवशी संस्थानचे पदाधिकारी व मान्यवरांकडून करण्यात आला.