लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या खंडाळा वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर महावितरणने मागील महिन्यात कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे स्थलांतरित केल्याने शेतकºयांना सिंचनात अडथळे निर्माण झाले असतानाच आता शिरपूर ग्रामपंचायतची पाणीपुरवठा योजनाही वीज पुरवठ्याअभावी प्रभावित झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हिवाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.महावितरण कंपनीने १७ सप्टेंबर रोजी शिरपूर येथील खंडाळा विज उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर कामरगाव येथी वीज उपकेंद्रात नेऊन बसविला. त्यामुळे खंडाळा वीज उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या कृषीपंपधारक शेतकºयांना सिंचन करणे कठीण झाले आहे. ऐन दूर्गोत्सव काळात आधीच भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच ट्रान्सफॉर्मर काढून नेल्याने इतर टट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार येऊन शिरपूर परिसरातील वाघी, खंडाळा, ढोरखेडा, कोठा, शेलगाव खवणे, ताकतोडा येथील शेतकºयांचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. शेतकºयांची समस्या अद्याप सुटली नाही. आता याच उपकेंद्रातून शिरपूर जैन ग्रामपंचायतच्या बोराळा प्रकल्पावरील मोटर पंपाला एक्सप्रेस फिडरद्वारे होणारा वीज पुरवठाही अनियमित होत आहे. ट्रान्सफॉर्मरचा अभाव असल्यामुळेच येथे वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या निर्माण होत असल्याने शिरपूर येथील पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. खंडाळा येथून काढून नेलेले ट्रान्सफॉर्मर चार ते पाच दिवसात पुन्हा लावण्यात येईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाºयांनी दिले होते; परंतु अद्याप तरी त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांच्या शेती सिंचनासह शिरपूर गावचा पाणीपुरवठा प्रभावी झाल्याने परिसरात विज वितरण कंपनीबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
ट्रान्सफॉर्मरअभावी शिरपूरचा पाणीपुरवठा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:25 PM