लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : ‘‘माझे कुलदैवत गजानन आहेत्याच्या पायी आहे माझा जीवपावतसे भक्ता आशीर्वाद देईआमाचि ही आई प्रेमस्वरूपउच्चरिता नाम होत असे आनंदगजानन स्मरा नित्य नेमभक्ति करा ठाम केवळ त्याची’’या उक्तिप्रमाणे आज सर्वत्र मालेगाव शहर गजाननमय झाले होते.विदर्भाचे आराध्य दैवत असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन होताच जोरदार स्वागत झाले. ७ जून रोजी सकाळी ८ वाजता मालेगाव शहरात पालखी दाखल झाली होती. पालखी आल्याबरोबर पाण्याच्या टाकीजवळ फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.पालखीचे ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता डव्हा येथे जोरदार आगमन झाले होते. शेगाव येथून ३१ मे रोजी ही पालखी निघाली असून, २ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पालखीसोबत ६०० वारकरी, तीन अश्व, नऊ वाहने, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर आदी संसथानच्यावतीने आणण्यात आलेले आहे. पालखीमध्ये शिस्तबद्धरीत्या पांढरा गणवेश घातलेले वारकरी हातात टाळ, मृदंग आणि भगवे झेंडे घेऊन असल्याने पालखी सोहळा लक्षवेधी ठरत आहे. सर्व ठिकाणी ‘जय गजानन’चा गजर होत होता. सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले होते. मालेगाव येथे ठिकठिकाणी रांगोळी काढलेल्या होत्या, चहा थंडपेय, मट्ठा यांचे वाटप करण्यात आले.पालखीचे आगमन काल मेडशी येथे सकाळी ९ वाजता झाले. त्यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी सुकांडा येथे आली. त्यावेळी सुकांडा येथील गजानन महाराज मंदिराच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी कुरळा येथे आली. त्यावेळीसुद्धा चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. डव्हा येथे संस्थानच्यावतीने पालखीचे स्वागत करुन कुरळा ग्रामस्थांच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी अनेक भविकांनी दशनर््ााचा लाभ घेतला आणि सकाळी ८ वाजता पालखीचे मालेगाव येथे आगमन झाले. पालखीला पंचायत समितीच्या प्रांगणात पंचायत समिती कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावतीने पुरी आणि आलू चटणीचा नास्ता देण्यात आला. त्यावेळी तहसीलदार राजेश वजिरे, गटविकास अधिकारी, बालविकास अधिकारी सोलव, सभापती, उपसभापती, ज्ञानबा सावले, बबनराव चोपडे, गजानन सारस्कार, किरण जिरवनकर, मेजर घुगे आदी मंडळी उपस्थित होती. त्यानंतर पालखी मुख्य मार्गाने शिव चौक, गांधी चौक, जैन मंदिर समोरून मेडिकल चौकातून जुन्या बसस्टँड मार्गे माहेश्वरी भवन येथे गेली. त्या ठिकाणी गोपाल मुंडदा आणि सत्तू मुंदडा (पळशीवाले ) यांच्यातर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे भोजन झाल्यानंतर पालखी शिरपूरकडे रवाना झाली. शिरपूर रस्त्यावरसुद्धा अनेक भाविक भक्तांकडून पालखीचे स्वागत करण्यात आले
‘गजानना’च्या दर्शनाला जनसागर उसळला!
By admin | Published: June 08, 2017 2:11 AM