गत पावसाळ्यात शिरपूर परिसरात दमदार पाऊस पडला. अति पावसामुळे पिकांचे नुकसानही झाले. सतत पडलेल्या पावसाने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सरासरी ८५० ते ९०० मिलिमीटर पर्जन्यमान होणाऱ्या शिरपूर परिसरात १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत तब्बल १२२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कूपनलिका, विहिरी, तलाव, शेततळे आदी जलस्रोत पावसाळ्यात ओसंडून वाहत होते. परिसरात १८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडल्याने पिकांना सिंचनासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत गरज भासली नाही. मात्र, त्यानंतर तूर, गहू, हरभरा या पिकांच्या सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू झाला. त्यात वातावरणात उष्णता वाढली. यामुळे विहिरी, तलाव, शेततळ्यांच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. काही विहिरींनी तर तळ गाठलेला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात परिसरात पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याची शक्यता वाटू लागली आहे.
तलाव, विहिरींच्या पातळीत लक्षणीय घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:20 AM